हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आधार कार्ड हे एक खूप महत्वाचे डॉक्युमेंट आहे. आधार अनेक प्रकारच्या कामांसाठी आवश्यक बनले आहे. आधार नसेल तर बँकेपासून ते कोणत्याही सरकारी कामामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आधार कार्डची गरज सर्वत्र वाढली आहे.
आधारच्या वाढत्या वापरासोबतच त्याच्याशी संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्येही भरपूर वाढ झालेली आहे. सध्या अनेक बनावट आधार कार्ड बनवले जात आहेत. अशा परिस्थितीत, बनावट आधार कार्ड तपासण्यासाठी MeitY आणि UIDAI मिळून एकत्र काम करत आहेत. UIDAI ही आधार कार्ड जारी करणारी संस्था आहे. जी आता केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) अंतर्गत काम करते.
UIDAI ने आता लोकांना याबाबत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. UIDAI ने सांगितले आहे की, प्रत्येक 12 अंक हा आधार कार्ड नंबर नाही. अशा परिस्थितीत अशा बनावट आधार नंबर पासून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.
यासोबतच UIDAI ने असेही सांगितले आहे की, कोणत्याही क्रॉस चेकिंगशिवाय तुम्ही आधार कार्ड स्वीकारू नका. जर तुम्हाला खरे आणि बनावट आधार कार्ड ओळखायचे असेल, तर काही सोप्या स्टेप्स फॉलो करून आपण ते शोधू शकाल.
चला तर मग त्या स्टेप्स समजून घेऊयात –
1. सर्वात आधी UIDAI ची अधिकृत वेबसाइट http://uidai.gov.in वर क्लिक करा.
2. आता My Aadhaar या पर्यायावर क्लिक करा
3. यानंतर आधारशी संबंधित अनेक सर्व्हिसेसच्या लिस्ट तुमच्यासमोर खुल्या होतील.
4. येथे Verify an Aadhaar number वर क्लिक करा
5. येथे 12 अंकी आधार नंबर टाका
6. त्यानंतर captcha एंटर करा
7. जर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा असेल तर तुम्हाला पुढील पेजवर रीडायरेक्ट केले जाईल
8. यानंतर तुम्हांला आधार नंबर, वय, लिंग आणि राज्य इत्यादींची माहिती दिसली तर तुमचे आधार कार्ड खरे असेल अन्यथा ते बनावट असल्याचे कळून येईल.