Aadhar Card : घरबसल्या एकाच मोबाईल नंबरद्वारे बनवा संपूर्ण कुटुंबाचे PVC Card

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधार कार्ड (Aadhar Card) हे एक अत्यंत महत्वाचे डॉक्युमेंट्स बनले आहे. त्याशिवाय आता कोणतेही काम करणे अवघड आहे. अनेक सरकारी योजनांमध्ये आधार कार्ड गरजेचे झाले आहे. त्याद्वारे तुमची ओळख पटवली जाते. सरकारी काम असो की खाजगी काम आधार कार्ड सगळीकडे दाखवावे लागेल. अनेक लोकं खिशातच आधार कार्ड बाळगतात. असे केल्याने काही कालावधी नंतर ते खराब होतात.

आता आधार कार्ड PVC Card मध्ये कन्वर्ट करता येते. आधार PVC Card वर हवामानाचा कोणताही परिणाम होत नाही. साधे आधार कार्ड (Aadhar Card) फाटण्याचा तसेच पाण्यात भिजून खराब होण्याचा संभव असतो. त्यामुळे ते सुरक्षित ठेवण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे PVC Card मध्ये कन्वर्ट करणे. आपण संपूर्ण कुटुंबासाठी मोबाईल क्रमांकावरून प्लॅस्टिक आधार कार्ड तयार करता येते. त्यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या..

अशा प्रकारे ऑनलाइन अर्ज करा

PVC आधार कार्डसाठी ऑनलाइन अर्ज देखील करता येईल. यासाठी http://myaadhaar.uidai.gov.in वर जावे लागेल.

यासाठी पहिले येथे रजिस्ट्रेशन करावे लागेल
यानंतर आधार कार्ड नंबर भरावा लागेल
त्यानंतर कॅप्चा कोड टाकावा लागेल
यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल
आता Order Aadhar PVC Card वर क्लिक करा
आधार डिटेल्स मिळताच Next वर क्लिक करा
आता 50 रुपये भरून प्रक्रिया पूर्ण करा

Aadhaar PVC Card: What Is Aadhaar PVC Card? How To Order And Get Aadhaar  PVC Card Online - Gizbot News

अशा प्रकारे UIDAI वर अर्ज करा

आपल्याला http://uidai.gov.in किंवा  http://Resident.uidai.gov.in वर ऑनलाइन आधार नंबर, व्हर्च्युअल आयडी किंवा एनरोलमेंट आयडी कार्ड वापरून PVC आधार कार्डसाठी अर्ज करता येईल.

हे पण वाचा :

Internet : नेटवर्कवर आल्यानंतरही इंटरनेट चालत नाही? मोबाईलमध्ये करा ‘हे’ बदल

Aadhar Card : बनावट आधार कार्ड कसं ओळखायचं? समजून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स

Aadhar Card : आधार कार्डमधील मोबाईल नंबर कसा बदलावा??? प्रोसेस समजून घ्या

aadhar card : बनावट आधार नंबर ओळखण्यासाठीची संपूर्ण पद्धत जाणून घ्या

Railway : ट्रेनचे तिकीट हरवले तर डुप्लिकेट तिकीट कसे मिळवावे ते समजून घ्या

Leave a Comment