हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी लंडनमध्ये सर्वात महागडे घर खरेदी केले आहे. या घराची किंमत 1446 कोटी आहे. 25, 000 स्क्वेअर फुटांचे आलिशान घर हेन्री डंकन मॅकलॅरेन, बॅरन अॅबरकॉनवे यांच्या नावावर होते. परंतु आता या घराला पुनावाल यांनी खरेदी केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, लाल-विटांनी बांधलेले हे घर हिल स्ट्रीट, लंडन येथे 1920 साली बांधण्यात आले होते. हे घर SII च्या UK-आधारित उपकंपनी Serum Life Sciences ने विकत घेतले आहे. त्यामुळे थोड्याच दिवसांमध्ये पूनावाला कुटुंबाच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची यूके उपकंपनी सीरम लाइफ सायन्सेस हे घर आपल्या ताब्यात घेईल. कंपनी या घराचे रूपांतर थेट गेस्ट हाऊसमध्ये करणार आहे. जेथे विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.
सर्वात महागडा करार
Serum Life Sciences ने या घरासाठी 138 दशलक्ष युरोचा करार केला आहे. हा करार आतापर्यंत लंडनमध्ये घरांसाठी करण्यात आलेला सर्वात महागडा करार आहे. यापूर्वी 2020 आली 2-8A रटलँड गेटचा सर्वात महागडा करार करण्यात आला होता. त्यानंतर दुसरा महागडा करार Serum Life Sciences ने केला आहे. त्यामुळे कंपनीला लंडनमधील हे घर सर्वात जास्त आवडल्यामुळे त्यासाठी एवढे जास्त पैसे मोजले असल्याचे म्हटले जात आहे.
घराची खासियत
Serum Life Sciences कंपनीने खरेदी केलेले हे घर हिल स्ट्रीट, लंडन येथे ठीक आहे. 25000 स्क्वेअर फुटाच्या या घराला 1920 साली बांधण्यात आली होती. या घरामध्ये 6 बेडरूम आणि एक मोठा स्विमिंग पूल आहे. लंडन मधील सर्वात सुंदर घरांमध्ये या घराची देखील गणना केली जाते. याच घराला आता पूनावाला यांनी विकत घेतले आहे.