दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करा, अन्यथा मृतांचा खच पडेल; ‘आप’ आमदाराचा केजरीवालांना घरचा आहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने अक्षरशः विस्फोट केला असून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत देखील कोरोना मुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत कडक लॉकडाऊन केला असतानाच आता खुद्द आपच्या आमदारानेच दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. आप चे आमदार शोएब इक्बाल यांनी ही मागणी केली आहे.

‘दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांना ना औषध मिळत आहे, ना हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन. लोकांचे कोणीच ऐकत नाहीय. मला दु:ख होतेय की आम्ही कोणाचीच मदद करू शकत नाही आहोत. मी सहा वेळा आमदार राहिलो आहे. मात्र, कोणही ऐकत नाहीय. त्यामुळे उच्च न्यायालयाने इथे राष्ट्रपती राजवट लावावी, नाहीतर इथे रस्त्यांवर मृतदेह पडलेले दिसतील,’ असे शोएब इक्बाल म्हटले आहेत.

दरम्यान, शोएब इक्बाल यांची राष्ट्रपातीची राजवटीची मागणी केजरीवाल सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. अगोदरच केंद्र सरकारने विशेष कायद्याद्वारे बहुतांश अधिकार हे नायब राज्यपालांना देऊन ठेवले आहेत. त्यामध्ये आता स्वपक्षाच्या आमदाराने राष्ट्रपती राजवटीची मागणी केल्याने ‘आप’ची आणखीनच कोंडी झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment