अकोल्यात आशा स्वयंसेविकांचे तोंडाला पट्टी बांधून आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकोला प्रतिनिधी | आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तोंडाला काळी पट्टी बांधून आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलन करण्यात आले. राज्यातील इतर जिल्ह्यातही आशा स्वयंसेविकांनी आंदोलन छेडले आहे.

आशा स्वयंसेविकांना लसीकरण, सर्व्हे, आरोग्यविषयक प्रबोधन यासह विविध ७३ प्रकारची काम करावी लागत असून, कामांच्या तुलनेत स्वयंसेविकांना दरमहा २ हजार ५०० रुपये मानधन देण्यात येते. स्वयंसेविकांना मिळणारे मानधन अत्यल्प असून, मानधनात वाढ करण्या संदर्भात शासना मार्फत देण्यात आलेली आश्वासने पूर्ण करण्यात यावी, या मागण्यांसाठी आशा वर्कर्स व गटप्रवर्तक राज्य कृती समितीने ३ सप्टेंबरपासून राज्यभरात आंदोलन सुरु केले आहे.

४ सप्टेंबरपासून राज्यातील आशा स्वयंसेविकांनी कामावर बहिष्कार टाकला आहे. मानधनात वाढ करण्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटना अकोला जिल्हा शाखेने १६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी स्वयंसेविकांनी तोंडाला काळी पट्टी बांधून मानधन वाढविण्याच्या मागणीकड लक्ष वेधले. या मूक आंदोलनात आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेचे अकोला जिल्हा अध्यक्ष राजन गावंडे, संध्या डिवरे, रुपाली धांडे, शितल दंदी यांच्यासह जिल्ह्यातील आशा वर्कर्स व गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या.

Leave a Comment