हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगभरात T20 क्रिकेटने खूपच कमी वेळात जास्त लोकप्रियता मिळवली. फलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या क्रिकेटच्या या प्रकारात अनेक फलंदाजांनी आपलं नाव मोठं केलं. विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर, ख्रिस गेल , रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी असे अनेक फलंदाजांनी आणि फलंदाजीच्या जोरावर T 20मध्ये आपली छाप पाडली. याच दरम्यान जगातील सर्वोत्कृष्ट T 20 फलंदाज कोण असा प्रश्न माजी कर्णधार सुनील गावस्कर याना विचारलं असता त्यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली.
सुनील गावस्कर यांच्या मते रोहित शर्मा किंवा विराट कोहली नाही तर आणखी एक दक्षिण अफ्रिकेचा खेळाडू ए बी डिव्हिलियर्स हा सर्वश्रेष्ठ फलंदाज असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. डिव्हिलियर्स प्रत्येक शॉट खेळतो. तो जेव्हा शॉट्स खेळतो ते खरंच पाहण्यासारखे असतात. तो फलंदाजी करताना मला पाहायला आवडतं.’ असंही सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ए बी डिव्हिलियर्स हा क्रिकेट मधील सुपरमॅन म्हणून देखील ओळखला जातो. यंदाच्या IPLच्या पहिल्या 7 सामन्यांमध्ये ए बी डिव्हिलियर्सची कामगिरी तुफान होती. डिव्हिलियर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून IPL खेळत आहे. डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.