किसनवीर कारखान्याच्या आखाड्यात आबा- काकांचा अवैध अर्ज वैध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातारा जिल्ह्यात पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या किसनवीर सहकारी साखर कारखान्यासाठी प्रचंड गदारोळानंतर आमदार मकरंद पाटील आणि जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात आबा- काका या बंधूची जोडी असणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

किसनवीर सहकारी साखर कारखानासाठी 3 मे रोजी मतदान होत आहे. यासाठी दि. 28 मार्च रोजीपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारी दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया झाली. यामध्ये आमदार मकरंद पाटील आणि नितीन पाटील यांनी पाच वर्षात केवळ दोन वेळा कारखान्याला ऊस घातल्याने त्यांचे नाव अवैध उमेदवारांच्या यादीत आले.

अर्ज अवैध ठरविताच आबा- काका यांनी हरकत घेत वकील यांच्यामार्फत आपले म्हणणे मांडले. आमदार गट आणि किसनवीर कारखाना व्यवस्थापनाने मांडलेली बाजू ऐकून आणि कागदपत्रांची तपासणी करून जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी आ. मकरंद पाटील आणि नितीन काका पाटील यांचे अर्ज वैध असल्याची घोषणा मंगळवारी (दि. 5) रोजी सकाळी केली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांसह त्यांच्या समर्थक आणि अखेर सुटकेचा निश्वास सोडला.