व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अभिजित बिचुकलेच मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; महिलांबाबत केली ‘ही’ मोठी मागणी

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे प्रसिद्धीस आलेले कवी मनाचे नेते अभिजित बिचुकले नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असतात. त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर महिला वर्गातील महत्वाच्या अशा गॅस सिलेंडरच्या दरवाढीवरून निशाणा साधला आहे. बिचुकलेंनी थे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले असून महिलांना ज्या पद्धतीने एसटी प्रवासात ५० टक्के आरक्षण दिले आहे. त्या पद्धतीने सिलेंडरवर देखील ५० टक्के सबसिडी द्यावी, अशी महत्वाची मागणी बिचुकले यांनी केली आहे.

अभिजित बिचुकले यांनी आज सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बिचुकले म्हणाले की, महिला वर्गाला एसटी बसच्या प्रवासासाठी ५० टक्के सवलत दिली त्याबाबत सरकारचं अभिनंदन करतो. मात्र, महिला वर्गाची खरी गरज असणाऱ्या सिलेंडरला १२०० रुपये द्यावे लागतायत याबाबत एकही लोकप्रतिनिधी बोलताना दिसत नाही.

मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे आणि त्यांनी महिलांना ताबडतोब सिलेंडरवर ५० टक्के सबसिडी द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. कारण महिलांसह सर्वसामान्यांच्या पुढील मुख्यमंत्री ही महिला असेल ही भुमिका मी मांडली होती मात्र आता माझी काॅपी इतर लोकं करायला लागले आहेत. मी बैल आहे माझी काॅपी कोणी करु नये बेडकानं बैल व्हायचं पाहू नये, असा खोचक टोला देखील बिचुकलेंनी लागावला. .