औरंगाबाद: दशमेशनगरातील निवृत्त वृद्धाचा घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देत, दरोडा टाकल्याची घटना 2015 मध्ये घडली होती. त्यावेळी सात गुन्हेगाराला पैकी सहा जणांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले होते. पण एक जण फरार झाला होता. हाच फरार आरोपी सहा वर्षांनी हाती लागला असून शुक्रवारी अंबाजोगाई येथून त्याला अटक करण्यात आली आहे. पांडुरंग उर्फ गजानन कचरे असे त्याचे नाव असून या गुन्ह्यात सर्व सातही जनावर मोक्कांतर्गत कारवाई झाली होती.
दशमेशनगरातील मिश्रीलाल बर्डिया यांच्या घरात 14 ऑक्टोबर 2015 रोजी सात जणांनी घुसून एक लाख रुपयांचे दागिने व 50 हजार रोख लुटून नेले होते. यातील सूर्यकांत मुळे,विनोद गायकवाड, गोरख खांडेकर, सुनिल पवार, नंदू शिरसाट, राजेंद्र कळसे यांना अटक झाली,मात्र पांडुरंग 2015 पासून फरार होता.
गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांना पांडुरंग अंबाजोगाईला असल्याचे समजले त्यांनी तातडीने गुन्हे शाखेचे एक पथक रवाना करत अंबाजोगाईला सापळा रचून आरोपी कचरे ला अटक केली.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group