कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कापिल (ता. कराड) येथील माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार हे पंचायत समिती कार्यालयासमोर गेले चार दिवस उपोषणास बसले आहेत तरी त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा कापिल ग्रामस्थांकडून पंचायत समिती कार्यालय वरती मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.
गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर ती 50 ग्रामस्थांच्या स्वाक्षरी करण्यात आलेल्या आहेत. अमरण उपोषणाला बसलेले गणेश पवार म्हणाले, विद्यमान सरपंच यांनी ग्रामपंचायतीमध्ये पदाचा गैरवापर करून चुकीची कामे केली आहेत. विद्यमान सरपंचांनी गावातील लोकांना नळपाणीपुरवठा मीटर एकच दरात उपलब्ध करून दिलेले नाहीत. तसेच पाणी योजनेमध्ये मळ्यातील लोकांना विचारात घेतलेले नसून त्यांना योजनेपासून वंचित का ठेवण्यात आले आहे? याचीही चौकशी करावी. तसेच शिवरत्न कंट्रक्शन यांनी ग्रामपंचायत हद्दीत केलेले गटर सुस्थितीत करून दिलेले नाहीत, याचीही चौकशी करण्यात यावी.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’