Acche Din Yenar Song Marathi : “अच्छे दिन” येणार येणार ग !! थेट गाण्यातून मोदी सरकारवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील नागरिकांसाठी अच्छे दिन येणार असा नारा देत नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना आश्वस्त केलं आणि जनतेने मोदींवर विश्वास टाकून त्यांना पंतप्रधान सुद्धा केलं. मात्र देशातील नागरिकांसाठी अच्छे दिन काय आले नाहीत. देशातील वाढती महागाई, दुसरीकडे वाढलेली बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या पिकाला मिळणारा कवडीची भाव यामुळे सर्वच क्षेत्रातील नागरिकांची मोठी निराशा झाली आहे. त्यामुळे कुठे गेले ते अच्छे दिन असा सवाल देशातील जनता मोदी सरकारकडे करत आहे. याच पार्श्वभूमीवर आता अच्छे दिन येणार येणार ग!! नावाचे उपहासात्मक गाणे (Acche Din Yenar Song Marathi) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खास बाब म्हणजे या गाण्याचा टोन प्रसिद्ध मराठी चित्रपट अशी हि बनवबनवी मधील एका गाण्यासारखा आहे.

वाचला वाढत्या महागाई आणि बेरोजगारीचा पाढा- Acche Din Yenar Song Marathi

या गाण्यातून देशातील वाढत्या महागाईवर आणि मुख्य म्हणजे बेरोजगारी बोट ठेवण्यात आले आहे. व्हायरल गाण्यात तुम्ही पाहू शकता कि, दोन महिला अतिशय उपहासात्मक पद्धतीने म्हणत आहेत कि कधी तरी अच्छे दिन येणार… देशातील पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमती, डाळींचा गगनाला भिडलेला भाव, गोडेतेलच्या किमती यांचा उल्लेख या गाण्यात सुरुवातीलाच करण्यात आला आहे. महागाई आपल्या उरावर बसली असून अच्छे दिनाचे गाजर सर्वसामान्यांचा खिसा रिकामा करत आहे असा टोला या गाण्यातून लगावण्यात आला आहे.

यानंतर गाण्याच्या दुसऱ्या कडव्यात देशातील वाढलेली बेरोजगारी आणि नोकऱ्यांचे कमी झालेले प्रमाण यावरून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आलाय. अच्छे दिनात अनेक नोकऱ्या गेल्या, अनेकजण शिकून सावरुन सुद्धा बेकार झाले, बीए, बीएससी तसेच बीएड वाले सुद्धा शिकूनही बेरोजगार आहेत मात्र तरीही भारत महासत्ता होणार असं म्हणत या गाण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उपहासात्मक टीका करण्यात आली आहे. सोशल मीडियावर हे अच्छे दिन वाले गाणे (Acche Din Yenar Song Marathi ) वाऱ्यासारखं पसरत असून लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. सध्या देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून निवडणुकीच्या काळातच हे गाणे व्हायरल झाल्याने मोदी सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.