हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कार्तिकी एकादशीला आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप गाडी शिरल्याने भीषण अपघात झाला आहे. कान्हे फाटा येथे हा अपघात झाला असून या अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून 30 वारकरी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आहे. अपघातातील जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनीही यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खालापूर उंबरी गाव येथून सुमारे दीडशे वारकरी हे आळंदीच्या दिशेने कार्तिकी यात्रेनिमित्त निघाले होते. हरिनामाचा गजर करत वारकरी रस्त्याच्याकडेने पायी जात होते. तेव्हा, जवळवून जाणाऱ्या पिकअप चालकाचा वाहनांवरील नियंत्रण सुटले आणि वारकऱ्यांच्या रांगेच्या मधोमध जाऊन काही जणांना धडक दिली. यात, ३० वारकरी जखमी झाल्याची माहिती तपास अधिकारी वडगाव मावळचे पोलीस उपनिरीक्षक चामे यांनी दिली आहे.
आळंदीकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीला कामशेत(साते)गावाजवळ वाहनाची जोरदार धडक बसून,या दुःखद घटनेत १८ वारकऱ्यांना गंभीर इजा झाली आहेत. जखमी वारकऱ्यांची प्रकृती लवकर बरी होवो ही प्रार्थना.आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करू. नजीकच्या रुग्णालयात त्वरित उपचार सुरू करण्यात आले आहेत
— Parth Pawar (@parthajitpawar) November 27, 2021
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी याबाबत ट्विट केलं आहे आळंदीकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीला कामशेत(साते)गावाजवळ वाहनाची जोरदार धडक बसून,या दुःखद घटनेत १८ वारकऱ्यांना गंभीर इजा झाली आहेत. जखमी वारकऱ्यांची प्रकृती लवकर बरी होवो ही प्रार्थना.आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करू. नजीकच्या रुग्णालयात त्वरित उपचार सुरू करण्यात आले आहेत असे पार्थ पवार यांनी म्हंटल.