हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे बेंगलोर महामार्गावर साताऱ्यातील कराड तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. चुकीच्या बाजूने आलेल्या स्कॉर्पिओने कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती कि कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. यामध्ये एक जण जखमी झाला आहे. या अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. अखेर पोलिसानी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
पुणे बेंगलोर महामार्गावर सध्या रस्त्याचे काम चाललं आहे. त्यामुळे गाडी चालवणे मोठ्या कसरतीचे ठरत आहे. सततच्या वाहतूक कोंडीमुळे गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढलेलं आहे. आज कराड येथील नांदलापूर हद्दीत साताऱ्याहुन कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर रॉंग साईडने आलेल्या स्कॉर्पिओ गाडीने कोल्हापूरकडे जाणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एक जण जखमी आहे.
दरम्यान, या भीषण अपघातानंतर महार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस घटनस्थळी दाखल झाले आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. तसेच अपघातातील जखमींना तात्कळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.