Accident News : जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जालना जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची (Accident News) बातमी समोर येत आहे. जालना बीड मार्गावर बस आणि ट्रकमध्ये हा अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रक बसवर जाऊन धडकला. आणि हा मोठा अपघात झाला. या अपघातात आत्तापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे तर १४ जण जखमी झाले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा पुरता चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अपघातातील जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रक बसवर गेला- Accident News

याबाबत अधिक माहिती अशी कि, सदर बस हि गेवराईकडून अंबड कडे जात होती, तर मोसंबी भरून येणारा आयशर ट्रक जालन्याहून येत होता. त्याचवेळी वडीगोद्री महामार्गावर मठ तांडा गावाजवळ बस आणि ट्रकची समोरा समोर धडक झाली. आयशर ट्रक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसवर जाऊन आदळल्यानं भीषण अपघात झाला. हि धडक इतकी भीषण होती कि दोन्ही गाड्यांचा पुरता चेंदामेंदा झाला. अपघाता वेळी बस मध्ये 30 प्रवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. यातील ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर १४ जण जखमी झाले आहेत.

अपघातानंतर तातडीने स्थानिक नागरिक त्यांच्या मदतीला धावले. जखमी प्रवाशांना जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मात्र मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सदर घटनेनंतर पोलीसांनाही बोलावण्यात आलं आहे. पोलीस या घटनेची अधिक चौकशी करत असून हा अपघात (Accident News) नेमका झाला कसा? याचा तपास करत आहेत. मात्र या भीषण अपघातामुळे मठ तांडा गाव हादरुन गेलं आहे.