अमरावती : हॅलो महाराष्ट्र – नागपूर-औरंगाबाद महामार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात (accident) झाला आहे. या अपघातात दोन्ही ट्रकमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. महामार्गावरील खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात (accident) झाला आहे. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक बराच काळ खोळंबली होती. नागपूर-औरंगाबाद महामार्गावर तब्बल ८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या अपघातामध्ये (accident) दोन्ही ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अमरावतीत दोन ट्रकचा भीषण अपघात, ट्रकमधील लोखंडी सळई घुसून चार जणांचा मृत्यू pic.twitter.com/mEZJ10TO5T
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) August 5, 2022
लोखंडी गज घेऊन हे ट्रक जात होते. मात्र, दरम्यान नागपूर-औरंगाबाद महामार्गावर रस्त्यावरील खड्डा चुकवताना हा अपघात झाला. या अपघातामुळे ट्रकमधील लोखंडी सळई ट्रकमधील प्रवाशांच्या शरीरात आरपार घुसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. हि धडक इतकी भीषण होती की अपघातानंतर (accident) चालकाच्या शरीरात लोखंडी गज शिरून त्याचा मृतदेह केबिनची काच तोडून बाहेर आला होता.
दारूच्या नशेत असणाऱ्या कार चालकाची सात वाहनांना धडक
डोंबिवलीमध्ये एक विचित्र अपघात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये डोंबिवली पश्चिमेतील उमेश नगर परिसरात गुरुवारी सायंकाळी 4 च्या सुमारास दारूच्या नशेत असणाऱ्या एका चारचाकी वाहनचालकाने उभ्या असलेल्या सहा ते सात गाड्यांना धडक (accident) दिली. अपघातग्रस्त वाहनांमध्ये 5 दुचाकी आणि 2 रिक्षांचा समावेश आहे. तसेच या कारने एका डीपीलाही धडक दिली आहे. कार चालकाचा वेग इतका भीषण होता की उभ्या असलेल्या रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
हे पण वाचा :
तत्काळ तिकीट बुकिंगद्वारे अशा प्रकारे मिळवा कन्फर्म सीट !!!
ED ची छापेमारी : ‘Vivo’सह भारतातील 44 कंपनीवर धडक कारवाई
मुख्यमंत्री शिंदेंच्या घरातील भिंतीवर अजूनही ठाकरेच; फोटोंनी वेधलं लक्ष्य
शेअर मार्केट मध्ये Pump and Dump द्वारे अशा प्रकारे केली जाते फसवणूक !!!
मुख्यमंत्री शिंदेंच्या घरातील भिंतीवर अजूनही ठाकरेंचं; फोटोंनी वेधलं लक्ष्य