देवदर्शनावरुन परतताना गाडीला अपघात; नवदाम्पत्यासह आठ जण जखमी 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद – देवदर्शन करून परतणाऱ्या नव दांपत्याच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वाळूजजवळील ग्रीन गोल्ड कंपनीजवळ घडली. या अपघातात नऊ दांपत्यासह आठ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील जखमी नवदाम्पत्याचा बुधवारीच विवाह झाला असून, सुदैवाने दोघांनाही गंभीर दुखापत झालेली नाही.

 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गंगापूर येथील सिद्धेश्वर जोगदंड याचा विवाह बुधवारी पैठण येथील लघाने यांच्या मुलीशी झाला. त्यानंतर गुरुवारी हे दाम्पत्य नातेवाईकांसोबत देवदर्शनाला गाडी (एम एच 46 एक्स 2114) मधून सातारा खंडोबा येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर गंगापूर येथे परत येत असताना औरंगाबाद अहमदनगर महामार्गावरील वाळूच्या पुढे ग्रीन गोल्ड कंपनी जवळ त्यांची गाडी रीव्हर्स येणाऱ्या एका स्विफ्ट कारला (एम एच 20 डीजे 7137) धडकली. यात नवरदेव सिद्धेश्वर, नववधू मोनिका यांच्यासह अन्य सहा जण जखमी झाले.

 

जखमींना प्राथमिक उपचारासाठी वाळूज येथील सुमन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment