युवक काॅंग्रेसचे मानस पगार यांचे अपघाती निधन

0
156
Manas Pagar of Youth Congress
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी, नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मानस दाैलत पगार (वय-32) यांचे अपघाती निधन झाले आहे. यामुळे काॅंग्रेसचा एक तरूण, तडफदार व अभ्यासू व्यक्तिमत्व असलेला चेहरा काॅंग्रेसचा गमावला आहे. नाशिक जिल्ह्यातील मित्रमंडळींना या बातमीमुळे दुःखाचा डोंगर कोसळला.

मानस पगार याच्या अपघाती निधनाचे वृत्त सत्यजित तांबे यांनी ट्विट् केले आहे. मानस पगार हे सत्यजित तांबे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून अोळख होती. मानसच्या निधनामुळे युवक काॅंग्रेसचा तरूण चेहरा हरपला. राज्यभरात युवक काॅंग्रेसच्या माध्यमातून मानस यांचा मित्र परिवार आहे. मानस यांच्यावर अत्यसंस्कार पिंपळगाव येथे गुरूवारी सकाळी 11 वाजता येथे होणार आहेत.