सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 970 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 587 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 9 हजार 482 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 82 हजार 970 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 69 हजार 596 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 94 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दिवसभरात 29 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात 10 हजार 538 जणांचे नमुने घेण्यात आले.
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टळलेला नाही : तज्ञ
राज्यात इतरत्र कोरोनाची दुसरी लाट अोसरत आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे या जिल्ह्यात कोरोनाचा पाॅझिटीव्ह रेट 10 टक्केकमी नाही. त्यामुळे या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टळलेला नसल्याचे तज्ञांचे मत आहे.