हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB च्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या बँकेचे असे अनेक ग्राहक आहेत ज्यांनी अजूनही KYC अपडेट केलेले नाही. त्यामुळे PNB ने ग्राहकांना KYC अपडेट करण्याबाबत इशारा दिला आहे. बँकेने यासाठी 12 डिसेंबर 2022 ही शेवटची तारीख निश्चित केली आहे.
PNB च्या वतीने, ग्राहकांना एसएमएस, ई-मेल आणि विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे KYC अपडेट करण्याविषयी सांगण्यात आले आहे. ज्या ग्राहकांनी या मुदतीपूर्वी त्यांचे KYC अपडेट केलेले नाही त्यांना बँकिंग आणि ट्रान्सझॅक्शनमध्ये अडचणी येऊ शकतील.
बँकिंग आणि व्यवहाराशी संबंधित काम करता येणार नाही
जर एखाद्याने 12 डिसेंबर 2022 पूर्वी KYC अपडेट केले नाही तर त्याला बँकिंग आणि ट्रान्सझॅक्शनशी संबंधित कामामध्ये अडचणी येऊ शकतील. अशा परिस्थितीत ग्राहकांना आपल्या बँक खात्यातून ट्रान्सझॅक्शन करण्यावर तात्पुरती बंदी देखील घातली जाऊ शकते. त्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यासाठी ग्राहकांना बँकेच्या शाखेत जावे लागेल. त्यामुळे जर आपण अजूनही केवायसी केलेले नसेल तर ते लवकरच अपडेट करा.
RBI च्या मार्गदर्शक तत्वाचा बँकेवर दबाव
हे लक्षात घ्या कि, RBI ने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व बँकांच्या ग्राहकांना केवायसी अपडेट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्यामुळे आता PNB नेही आपल्या ग्राहकांना लवकरात लवकर KYC अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. मात्र तरीही असे अनेक ग्राहक आहेत ज्यांनी त्यांचे अजूनही केवायसी अपडेट केलेले नाही. PNB कडून एका ट्विट द्वारे याबाबतची माहिती दिली गेली आहे.
अशा प्रकारे अपडेट करा KYC
हे लक्षात घ्या कि, आपल्या बँक खात्याचे KYC अपडेट करण्यासाठी ग्राहकांना आपल्या बँकेच्या जवळच्या शाखेत जावे लागेल. यासाठी पासपोर्ट आकाराचा फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड या कागदपत्रांची आवश्यकता भासेल. त्याच बरोबर आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सोबत ही कागदपत्रे जोडून KYC सहजपणे अपडेट करता येईल. त्याचवेळी बँकेकडून हे देखील स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, केवायसी करण्यासाठी बँकेकडून ग्राहकांना मेसेज किंवा फोनद्वारे वैयक्तिक माहिती विचारली जात नाही. त्यामुळे अशा कोणत्याही कॉल किंवा मेसेजवर अजिबात विश्वास ठेवू नका.”
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.pnbindia.in/Know-Your-Customer.html
हे पण वाचा :
Insurance Schemes : ‘या’ सरकारी विमा योजनांच्या प्रीमियममध्ये वाढ, आता भरावे लागणार जास्त पैसे
Axis Bank देखील FD वर देणार जास्त व्याज, जाणून घ्या नवीन व्याजदर
Train Cancelled : रेल्वेकडून आज 350 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
Vi च्या प्लॅनमध्ये वर्षभराच्या व्हॅलिडिटीसहीत मिळतील ‘हे’ अतिरिक्त फायदे