यावर्षीची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते पांडुरंगच होऊ देणार नाही, हे निश्चित : आचार्य तुषार भोसले

0
56
Acharya Bhosale
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांच्या विजयानंतर भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी “हॅलो महाराष्ट्र” सोबत बोलतांना प्रतिक्रिया दिली की “महाराष्ट्राच्या जनतेसोबत पांडुरंगाला सुद्धा हे महावसुली सरकार नकोय हे आज सिद्ध झालंय उद्धवजी.

सतत मंदिरे बंद ठेवणाऱ्या अधर्मी सरकारच्या हकालपट्टीचा हा संकेत आहे.

यावर्षीची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते पांडुरंगच होऊ देणार नाही,  हे मात्र निश्चित. तुमचं काऊंट डाऊन सुरु झालंय, उद्धवजी तयार रहा’.

दरम्यान, आज पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये भाजपचे समाधान आवताडे विजयी झाले असून भगीरथ भालके यांचा पराभव झाला आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि सगळ्याचं भाजप नेत्यांनी ही निवडणूक खूप प्रतिष्ठेची केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here