वाई येथे वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या 3 वाहन चालकांवर कारवाई

0
178
Wai Police
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
वाई पोलिसांनी वाहतूकीला अडथळा निर्माण होईल अशी वाहने लावणाऱ्या तीन वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहने कशी ही रस्त्यावर उभी करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा धडाका वाई पोलिसांनी सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वाई पोलीस ठाण्याचे जवान गस्त घालत असताना त्यांना वाहने कशी ही लावल्याचे निदर्शनास आले. त्यावरून कारवाई करण्यात आली. त्यामध्ये कोर्ट कॉनरवर दि. 1 रोजी दुपारी 12 वाजता अपेरिक्षा क्रमांक (एमएच- 11- सीजे- 3044) ही वाहतुकीला अडथळा आणत उभी केल्याप्रकरणी वसंत सोमा राठोड (वय- 50, रा. लाखानगर, वाई) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भीमनगर तिकाटणे येथे उभा असलेला ट्रक (एमएच- 12- एलटी- 1691) हा उभा केल्याप्रकरणी ज्ञानेश्वर रोहिदास हेळकर (वय- 31 रा. शनिवार पेठ, मंगळवेढा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ट्रक क्रमांक (एमएच- 12 एमव्ही- 8085) हा उभा केल्या प्रकरणी राजू भिमाजी गायकवाड (वय- 40, रा. महोडे, ता. भोर) याच्यावर आयपीसी 283 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.