रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाई ; जिल्हाधिकारी-पोलीस आयुक्तांची संयुक्त कारवाई

औरंगाबाद : प्रोझाॅन मॉल येथील केएफसी, कारिमस, किचन, डोमिनोज, केवेनटर्स आणि एपीआय कॉर्नर येथील हॉटेल लोकसेवा सील करण्यात आले आहे.

कोरोना नियमांचं उल्लंघन करत रात्री उशिरा पर्यंत हॉटेल सुरू ठेवणाऱ्या हॉटेल्स नुकत्याच प्रशासनाकडून सील करण्यात आल्या. रात्री एपीआय कॉर्नर येथील हॉटेल लोकसेवा समोर ग्राहकांची गर्दी निदर्शनास येता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी हॉटेल सील केले.

दरम्यान पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या झोमॅटो बॉयकडून प्रोझोन मधील दुकान सुरू असल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांनी प्रोझोन गाठून तेथील सुरू असणारी केएफसी, कारिमस किचन, डोमिनोज आणि केवेनटर्सची दुकाने सील केली. कोरोना नियमावली नुसार पार्सल घरी बोलावण्याची सुविधा रात्री ८ ते सकाळी ६ चा वेळ वगळता सुरू असेल

You might also like