Friday, June 2, 2023

मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई; तीन लाख दंड वसूल

औरंगाबाद | कोरोना महामारीमूळे संपूर्ण राज्यभर निर्बंध लावण्यात आले आहेत. आता कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असताना कोरोनाचे नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहे. परंतु कोरोना महामारीचे संकट अजूनही टळलेले नाही त्यामुळे मनपाच्या नागरी मित्र पथकाकडून मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

1 ते 25 जुलै दरम्यान 837 जनांवर कारवाई करण्यात आली आहे. 3 लाख 18 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याबाबत नागरी मित्र पथकाचे प्रमुख प्रमोद जाधव यांनी माहिती दिली. कोरोनाचे संकट असताना देखील वाहनधारक विना मास्क फिरताना दिसतात. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करणाऱ्यावर देखील कारवाई करण्यात येत आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालण्यात आली असली तरीही नागरिकांकडून प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्यात येत आहे. गेल्या 25 दिवसांमध्ये 10 लाख 64 हजार 100 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

आतापर्यंत विना मास्क 837 जणांवर कारवाई करण्यात आली असून 3 लाख 18 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर 1 लाख 31 हजार 100 रुपये, कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 116 जणांवर 3 लाख 88 हजार 500 आणि 87 जणांवर प्लास्टिक कारवाई करण्यात आली असून 2 लाख 56 हजार रुपये दंड आकारण्यात आले आहे.