कराड नगरपालिकाचा कारवाईंचा धडाका : आजअखेर 153 नळकनेक्शन तोडले तर 45 मिळकती सील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

येथील नगरपालिकेने मार्च महिना वर्षाअखेर सुरु झाल्याने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे उद्दीष्टये पूर्ण करण्यासाठी कर वसुली विभागामार्फत वसुलीचे काम जोरात सुरू असून नगरपालिका कर वसुली विभागाने कारवाईचा धडाका सुरू आहे. मार्च महिना सुरु झाल्यापासून 45 मिळकती सील केलेल्या असून त्यातील 17 मिळकतधारकांनी कर भरल्याने त्या पुन्हा मिळकतधारकांच्या ताब्यात देण्यात आलेल्या आहेत. आजअखेर एकूण 153 मिळकतींचे नळ कनेक्शन कट केलेली आहेत.

कर वसुली विभागाने फेब्रुवारीपासूनच कर वसुलीस सुरुवात केलेली होती. मिळकतधारकांना कर वेळेत भरण्यासाठी वारंवार मिळकत धारकांना सूचना दिल्या होत्या. तसेच डिसेंबर व जानेवारी महिन्यात जप्तीपूर्व नोटीसाही बजावण्यात आलेल्या आहेत. तरीही अद्याप ज्या मिळकतधारकांनी कर भरलेला नाही. अशा मिळकतधारकांवर मार्च महिन्यात कारवाई सुरु केलेली आहे.

सदरची कारवाई मुख्याधिकारी तथा प्रशासक रमाकांत डाके यांचे मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक उमेश महादर, लिपीक इकलास शेख, जयवंत यादव, सुरेश जाधव, जितेंद्र मुळे, फिरोज मुजावर, सादिक मुल्ला, राजेंद्र ढेरे, सुनिल बसरगी, फैयाज शेख, पांडुरंग सपकाळ, मधुकर रेठरेकर, अयाज आत्तार, तसेच शिपाई विनोद भोसले, राजेंद्र जाधव, रशिद दिवाण, जगन्नाथ शिंदे, सुभाष पवार, अधिक कोळेकर, विठ्ठल मोहिते, झाकीर मुल्ला, फारुक खैरतखान, दिलीप चौगुले अशोक पवार व कंत्राटी 4 कर्मचारी यांनी कारवाई केलेली आहे.

पालिकेने 11 पेठा व हद्दीबाहेरील भागासाठी एकूण 4 पथके तयार केलेली आहेत. यामध्ये पथक क्र. 1 मध्ये सोमवार, गुरुवार व शुक्रवार पेठ, पथक क्र. 2 मध्ये मंगळवार, बुधवार व हद्दवाढ ग्रामीण 1 पथक क्र. 3 मध्ये शनिवार-2, शनिवार 3 व रविवार पथक क्र. 4 मध्ये शनिवार 1 हद्दवाढ ग्रामीण 2 व गजानन हौसिंग सोसायटी विद्यानगर अशी 4 पथके तयार केली असून त्याप्रमाणे वसुलीचे कामकाज व कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. रमाकांत डाके यांनी दिलेले आहेत.

नगरपालिकेची घरपट्टीची एकूण मागणी 19 कोटी 64 लाख 12 हजार असून आजअखेर घरपट्टीची एकूण वसुली 11 कोटी 78 लाख 22 हजार इतकी 60 टक्के वसुली झालेली असून अद्याप 7 कोटी 85 लाख 90 हजार इतकी येणेबाकी वसुली करणेची आहे. पाणीपट्टीची एकूण मागणी 5 कोटी 28 लाख 9 हजार इतकी असून आजअखेर पाणीपट्टीची एकूण वसुली 2 कोटी 52 लाख 19 हजार इतकी 47.75 टक्के वसुली झालेली असून अद्याप 2 कोटी 75 लाख 90 हजार इतकी येणेबाकी वसुली करणेची आहे. घरपट्टी व पाणीपट्टी ची एकूण येणेबाकी 10 कोटी 61 लाख 80 हजार इतकी रक्कम येणेबाकी आहे. यापैकी शासकीय कार्यालय मिळकतींची घरपट्टी व पाणीपट्टी करांची एकूण र.रु. कोटी 2 लाख 8 हजार इतकी येणेबाकी राहिलेली असून या वसुलीसाठी पाठपुरावा सुरु आहे.

मार्च महिना वर्षाअखेर असल्यामुळे कर वसुली विभाग हा सार्वजनिक सुट्टीच्या – दिवशीही सुरु राहणार असल्याने नागरीकांनी आपल्या मिळकतीची घरपट्टी व पाणीपट्टी कराची रक्कम 31 मार्चपूर्वी नगरपरिषदेत भरुन सहकार्य करावे.

मिळकतधारकांनी लवकरात लवकर मालमत्ता कर व पाणीकर भरावा

शहरातील ज्या मिळकतधारकांनी आपला घरपट्टी व पाणीपट्टी कर भरलेला नाही. अशा मिळकतधारकांनी लवकरात लवकर कर भरुन नगरपरिषदेस सहकार्य करावे व पुढील जप्ती, नळ कनेक्शन कट करणे व नांवे फ्लेक्स बोर्डवर प्रसिध्द करणे यासारखे कारवाईचे कटू प्रसंग टाळावेत, असे आवाहन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले आहे.

Leave a Comment