कराड | कराडच्या राज्य उत्पादन शुल्क पथकाने केसे पाडळी, मलकापुर (ता.कराड जि. सातारा) या ठिकाणी छापे मारुन अवैद्य दारू वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई केली आहे. सदरच्या कारवाईत एका चारचाकीसह दुचाकी व दारूच्या बाटल्या जप्त केला आहेत.
अवैद्य मद्य चोरटी वाहतुक व विक्री यावर प्रतीबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत वारंवार कारवाई करणेत येत असतात. त्यानुसार कोल्हापूरचे विभागीय उप-आयुक्त वाय. एम. पवार यांचे मार्गदर्शनानुसार सातारचे अधीक्षक अनिल चासकर यांचे आदेशानुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कराड विभाग कराड यांच्या पथकाने केसे पाडळी, मलकापुर (ता.कराड जि. सातारा) या ठिकाणी छापे मारुन कारवाई केली.
इन्तकाब वाहीद कच्छी (रा.शनिवार पेठ कराड), हेमंत श्रीमंत पवार (रा. शिवाजी चौक मलकापुर ता.कराड जि. सातारा) याचेंवर मुंबई दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईमध्ये दुचाकी होंडा अॅक्टीवा क्र. (MH-12- LK- 8627) तसेच एक चारचाकी मारूती 800 (क्र. MH- 12- PF- 6537) वाहन जप्त करण्यात आले आहे. सदर वाहनांमध्ये देशी दारु संत्रच्या 180 मि.ली. क्षमतेच्या एकुण 384 बाटल्या मिळून आल्या असून वाहनांसह एकुण रुपये 1 लाख 68 हजार रूपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाचे निरीक्षक संजय साळवे, निरीक्षक शिरीष जंगम (अतिरीक्त), सहाय्यक दुय्यम निरीक्षक नितीन जाधव, जवान विनोद बनसोडे, भिमराव माळी, सचिन जाधव यांनी केली असुन यापुढेही अशीच कारवाई करण्यात येईल असे विभागाचे निरीक्षक संजय साळवे यांनी सांगितले.