हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बीचवरील नीलरत्न या बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नारायण राणे यांच्या साठी हा मोठा धक्का मानला जात असून यामुळे आगामी काळात शिवसेना आणि राणे कुटुंबियामधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणाला आदेश दिले आहेत. नारायण राणेंच्या अधीश बंगल्याच्या पाहणीचा वाद ताजा असताना निलरत्न बंगल्याला ही कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. नारायण राणे याबद्दल काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे.
एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने नारायण राणे यांच्या मालवण येथील निल रत्न बंगला बांधताना सीआरझेड 2 चे उल्लंघन झाले अशी तक्रार ऑगस्ट 2021 ला केली होती. त्यानंतर तक्रारीची कॉपी आपल्याला मिळाल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्त्याने दिली आहे. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.