बॉलीवूडचा ‘खिलाडी’ अक्षयकुमारला कोरोनाची लागण

akshay kumar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने कहर केला असून रोज तब्बल 40 हजार रुग्ण वाढत आहेत. दरम्यान आता बॉलीवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. अक्षयने स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

अक्षय म्हणाला, आज सकाळी माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर मी सर्व प्रोटोकॉल पाळत स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मी सध्या घरातच क्वारंटाईन आहे. तसेच डॉक्टरांनी दिलेले सर्व उपचार घेत आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे. आलिया भट्ट, आमिर खान, कार्तिक आर्यन, परेश रावल यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी कोरोनाबाधित झाले आहेत. तर आर माधवनने मजेशीर पद्धतीने कोरोनाबाधित असल्याची पोस्ट शेअर केली होती. त्याशिवाय रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन वरुण धवन, नीतू सिंह यांसह अनेकांना यापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं होतं.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group