अभिनेता अक्षय वाघमारे झाला बाबा तर गँगस्टर अरूण गवळी आजोबा; घरी अवतरले कन्यारत्न

Actor Akshay Waghmare_
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता अक्षय वाघमारे हा बाबा झाला आहे. बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप अशा अनेक मराठी चित्रपटात त्याने विविध भूमिका साकारल्या आहेत. मात्र आता तो खऱ्याखुऱ्या आयुष्यात बाबाची भूमिका साकारतो आहे. अक्षयची पत्नी योगिता गवळी यांनी काल दुपारी एका गोड कन्यारत्नाला जन्म दिला आहे.  आई आणि मुलगी दोघीही सुखरुप आहेत. स्वतः अक्षयने इन्स्टावर मुलगी झाल्याची बातमी आपल्या चाहत्यांसह शेअर केली आहे. यामुळे त्याचे चाहते त्याच्यावर आणि योगितावर अभिनंदनाचा वर्षाव करीत आहेत. योगिता ही ‘डॅडी’ अर्थात गँगस्टर अरूण गवळी यांची मुलगी आहे. त्यामुळे अरूण गवळी आता आजोबा झाले आहेत.

https://www.instagram.com/p/COk4k0fBHsQ/?utm_source=ig_web_copy_link

बाबा झाल्यावर अक्षयच्या चेहऱ्यावरचा आनंद खळखळ वाहणारा होता. दरम्यान प्रतिक्रिया देत तो म्हणाला, ‘मला इतका आनंद झाला आहे की तो मी शब्दात मांडू शकता नाही. एक बाबा म्हणून मी माझा प्रवास सुरू करणार आहे आणि त्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. बाळ आणि योगिता दोघेही सुखरूप आहेत.’ एवढंच नाही तर अक्षय पुढे म्हणाला की, ‘आमच्या लग्नाला वर्ष पूर्ण होणार असतानाच या गोड बातमीने हा आनंद द्विगुणित झाला आहे. कुटुंबात नवीन सदस्य येणार असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. इतकेच नव्हे तर बाळाचे नाव काय ठेवणार याचा विचार आता सारे करू लागले आहेत.’

https://www.instagram.com/p/CGxhubhB5ii/?utm_source=ig_web_copy_link

८ मे २०२० रोजी अक्षय व योगिता यांचा मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला होता. यांच्या लग्नाचे फोटो देखील प्रचंड वायरल झाले होते. इतकेच नव्हे तर शासनाचे नियम पाळून त्यांनी हा सोहळा पार पाडला होता. या शुभप्रसंगी गँगस्टर अरूण गवळी देखील आपल्या लेकीस शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.

 

https://www.instagram.com/p/CLQyx4iB6yx/?utm_source=ig_web_copy_link

​त्यानंतर अक्षयने आपल्या चाहत्यांसोबत तो बाबा होणार असल्याची गुडन्यूज शेअर केली होती. A grand adventure is about to begin, Waiting for our new edition…❤️ अशा कॅप्शनसह अक्षयने ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती आणि आता तो प्रत्यक्षात बाबा झाला आहे.

https://www.instagram.com/p/CACS6h5hbNK/?utm_source=ig_web_copy_link

अक्षय व योगिता दोघे लग्नाआधी ५ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. यादरम्यान कुटुंबीयांनी दोघांनाही लग्न करण्याचा सल्ला दिला असता दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. अक्षयने फत्तेशिकस्त, बेधडक, दोस्तीगिरी आणि बस स्टॉप या मराठी चित्रपटांत काम केले आहे. ‘फत्तेशिकस्त’ या सिनेमात अक्षयने सरदार कोयाजी नाईक बांदल यांची भूमिका साकारली होती. तर अक्षयची पत्नी योगिता गवळी- वाघमारे ही एक एनजीओ चालवते. या माध्यमातून महिलांच्या आरोग्यासाठी ती सातत्याने कार्यरत आहे.