हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘राधे- युअर मोस्ट वॉन्टेट भाई’ या चित्रपटानंतर अभिनेता सलमान खान याचा ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात सलमान आपला जीजा अर्थात त्याची बहीण अर्पिताचा पती आयुष शर्मा सोबत झळकणार आहे.
https://www.instagram.com/p/CPgBzi3Hxop/?utm_source=ig_web_copy_link
त्याचसोबत बहुचर्चित आगामी चित्रपट ‘कभी ईद कभी दिवाली’ यामध्ये पुन्हा एकदा सलमान खान आणि आयुष शर्मा एकत्र दिसणार आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्यासोबत जहीर इकबाल हा अभिनेता देखील या चित्रपटात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
https://www.instagram.com/p/CIlKF7PFbwv/?utm_source=ig_web_copy_link
बॉलिवूडमधील आगामी अॅक्शन कॉमेडी चित्रपट ‘कभी ईद कभी दिवाली’ मध्ये अभिनेता आयुष शर्मा आणि जहीर इकबाल सलमान खानच्या मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहेत. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या रिपोर्टनुसार, ‘कभी ईद कभी दिवाली’ हा आगामी चित्रपट तीन भावांच्या कथानकावर आधारित आहे.
https://www.instagram.com/p/CP-IWhchtcn/?utm_source=ig_web_copy_link
यात मोठ्या भावाचे लग्न न झाल्याने लहान भावंडांचेही लग्न रखडले आहे. यात आयुष शर्मा आणि जहीर इकबाल यांनी सलमानच्या सख्ख्या मोठ्या भावाची भूमिका साकारावी, हा खुद्द सलमानचा स्वतःचाच मानस होता. खऱ्या आयुष्यातील लोक चित्रपटात सोबत असल्यास भावना व्यक्त करणे अत्यंत सोपे होते, असे सलमानने एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.
https://www.instagram.com/p/CP91wD2hWd9/?utm_source=ig_web_copy_link
अभिनेता सलमान खान आणि अभिनेता जहीर इकबाल यांच्या खाजगी आयुष्यात त्यांचे एकमेकांसोबत चांगले बॉन्डिंग आहे. यामुळे त्यांना चित्रपटात एकत्र काम करताना वेगळी अशी केमिस्ट्री तयार करावी लागणार नाही उलट त्यांची केमिस्ट्री चांगली रंगेल, असे म्हणायला काहीशी हरकत नाही.
https://www.instagram.com/p/CL_yxMKF0pW/?utm_source=ig_web_copy_link
फरहाद समजी हे हि कथा रुपेरी पडद्यावर सादर करणार आहेत. तर या चित्रपटात सलमान खान सोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री पूजा हेगडे झळकणार आहे. माहितीनुसार या चित्रपटात ड्रामा, इमोशन, रोमांस आणि अॅक्शन असे फुल्ल पॅकेज एकत्रितपणे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट कौटुंबिक एकतेचे प्रकटीकरण करणारा आहे.