अभिनेता फरहान अख्तर दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार; ‘या’ मराठी मॉडेलसोबत होणार शुभमंगल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता फरहान अख्तर दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. फरहान आणि मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकर यांचं या वर्षात शुभमंगल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. फरहान अख्तर दोन वर्षांपूर्वी पत्नी अधुनापासून विभक्त झाला होता. मात्र, फरहानने यावर सार्वजनिक आयुष्यात भाष्य करणं नेहमी टाळलं. अधुनासोबतच्या घटस्फोटानंतर फरहान आणि शिबानी यांचे सुत जुळल्याच्या बातम्या बॉलिवूड वर्तुळात येत होत्या.


View this post on Instagram

Merry Christmas from the Mad-Hatters .. ????????????❤️#seasonsgreetings

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on Dec 25, 2019 at 5:58am PST

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदाच एकत्र माध्यमांसमोर आली होती. त्यानंतर ते दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झालं होतं. दरम्यान अख्तर कुटुंबातील खाजगी कार्यक्रमात शिबानी सहभागी होण्याची छायाचित्रे सोशल मीडियावर झळकली आहेत. फरहान अख्तरचे वडील प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत शिबानी कुटुंबाचा एक भाग असल्यासारखी वावरत असल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली असतांना फरहान आणि शिबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती मिळत आहे.

Untitled design (18)

फरहान आणि शिबानी यांनी आता आपल्या नात्यात आणखी एक पाऊल पुढे टाकत लग्नाचा निश्चय केल्याचं समजतं. शिवाय, त्यांच्या कुटुंबामध्येही लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. लग्नाची तारीख अद्याप कळू शकलेली नाही.

Untitled design (19)