हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तसेच बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून कोरोनाला आटोक्यात आणन अवघड बनलं आहे. देशातील या कोरोना परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. करोनाच्या काळामध्ये सुरु असणाऱ्या या आरोप प्रत्यारोपांमध्ये अभिनेते गजेंद्र चौहान यांनीही उडी घेतली असून मोदी सरकारचे समर्थन केले आहे.
गजेंद्र चौहान यांनी एक ट्विट केलं आहे. “गाय आपल्या मालकावर नाराज असली तरी ती रुसून खाटीकाच्या घरी जात नाही. त्यामुळेच आम्ही मोदींसोबतच आहोत,” असं ते म्हणाले आहेत. चौहान यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
गाय भले ही अपने मालिक से नाराज हो..लेकिन रूठकर कभी कसाई के घर नहीं जाती..!
इसलिए हम मोदी जी के साथ ही हैं 🚩
— Gajendra Chauhan (@Gajjusay) May 11, 2021
दरम्यान, गजेंद्र चौहान यांच्या ट्विट नंतर अनेक युजर्स नी त्यांना ट्रोल केलं आहे तर काहींनी उलट सवाल केलं आहेत. एक युजर्स म्हणला, तुम्ही मोदींसोबत आहात हा तुमचा भ्रम आहे. खरं तर मोदींना त्यांच्या पदावर प्रेम आहे आणि तुम्हाला भविष्याची चिंता आहे. तुम्ही जनतेला गाय म्हणत आहात तर खाटीक कोण आहे, हे सुदधा आपण स्पष्ट करावं.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.