हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात नथुराम गोडसेंची भूमिका साकारल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यावरुन काहींनी अमोल कोल्हे यांना विरोध केला तर काहींनी यावरून राष्ट्रवादी काँग्रेस वर निशाणा साधला. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर अभिनेते नाना पाटेकर यांना विचारलं असता त्यांनी अमोल कोल्हे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
नाना पाटेकर म्हणाले, अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत, त्यांनी कोणती भूमिका करायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तीस वर्षांपूर्वी मीही गोडसेंची भूमिका केली होती. याचा अर्थ मी त्याचं समर्थन करत नाही. समर्थन करत असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. भूमिका करणं हे माझं उपजीविकेचे साधन, यात माझी चूक आहे का? प्रत्येक गोष्टीचं भांडवल करायची गरज नाही, अशा शब्दांत त्यांनी कोल्हेंच्या टीकाकारांना सुनावलं.
दरम्यान, यापूर्वी खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांची पाठराखण केली होती. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेस करण्यापूर्वी नथुराम गोडसे यांची भूमिका केली होती. भूमिका केली म्हणजे गोडसे ला समर्थन दिलं अस होत नाही असेही पवारांनी म्हंटल.