‘Oops’ बच गयी रे बाबा..! अभिनेत्री आरती सिंग जेट स्कीवर पोझ देत पडता पडता वाचली; पहा व्हिडीओ

0
86
Arti Singh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आणि टीव्ही अभिनेत्री आरती सिंग सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. नुसती सक्रिय नव्हे तर आजकाल ती चांगलीच चर्चेतसुद्धा आली आहे. आरती आपल्या बोल्ड फोटोशूटमूळे नेहमीच चर्चेत असते. आरतीचा फोटोंमधील बोल्ड आणि बिनधास्त अंदाज तिच्या चाहत्यांना भयंकर आवडत असतो. अलीकडेच आरतीने बिकिनीमध्ये जेट स्कीवर पोझ देण्याचा प्रयत्न केला आहे. पण हा प्रयत्न पुरता फसला आणि आरती oops मुमेंटची शिकार होता होता राहिली.

https://www.instagram.com/p/CPKm0qUjUgf/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्री आरती सिंगने मालदीव व्हॅकेशनचे काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. आरतीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती निळ्या रंगाच्या हॉट बिकिनीमध्ये दिसत आहे. आरतीचे हे बोल्ड अंदाजात फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. आरतीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती वॉटर जेट स्कीवर उभी असताना पोझ देण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. मात्र जेटवर तिचा तोल गेला आणि हा प्रयत्न निष्फळ ठरला. आरतीचा हा व्हिडीओ पाहून वाटते की ती खरोखरच ‘Oops’ मूमेंटची शिकार होता होता थोडक्यात बचावली.

https://www.instagram.com/p/CPFdSxRjHPO/?utm_source=ig_web_copy_link

हे इतकेच नाही तर हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, मी पोझ देण्याचा प्रयत्न केला आणि मग हार मानली. काही यूजर्स तिचे हे फोटो बघून चांगलेच संतापले आहेत. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अशी कमेंट एका यूजरने केली आहे. तर अन्य बऱ्याच युजर्स आणि तिच्या चाहत्यांनी तिच्या या बोल्ड अंदाजाचे कौतुक केले आहे. आरती सिंग प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आहे. तर कश्मिरा शाहची नणंद. आरतीने २००७ साली मायका या मालिकेतून अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली होती. त्यानंतर आरती बिग बॉस सीजन १३ मध्ये झळकली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here