अभिनेत्री अनिता हसनंदानीने पतीच्या कानफडात लगावली आणि झाली ट्रोल; नेमके असे झाले तरी काय ते जाणून घ्या

0
51
Anita Hasnandani
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील ‘नागीन’ सिरीयल फेम म्हणजेच अभिनेत्री अनीता हसनंदानी सध्या सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. अनीता नुकतीच एका गोड मुलाची आई झाली आहे. त्यामुळे सध्यातरी ती आपल्या मुलाच्या संगोपनात अत्यंत व्यग्र आहे. पण तरीही तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतोय. अहो इतकेच नाही तर या व्हिडीओमुळे अनीता जबरदस्त ट्रोलसुद्धा होतेय. या व्हिडिओत अनिता आपल्या पतीसोबत मजा मस्ती करताना त्याला खाडकन कानशिलात लगावताना दिसतेय. हेच ते कारण ज्यामुळे ती ट्रोल झाली आहे.

https://www.instagram.com/p/CPKxijHgI62/?utm_source=ig_web_copy_link

या व्हिडीओत अनीता पती रोहित रेड्डीसोबत प्रँक करते आहे. रोहित बसलेला आहे तर त्याच्या पाठी अनीता उभी आहे. माझ्या हातात एक अदृश्य धागा आहे जो धागा ती रोहितच्या एका कानात टाकून दुस-या कानातून बाहेर काढणार आहे, त्यानंतर एक जादू होईल,असे अनीता व्हिडीओच्या सुरूवातीला रोहितला म्हणते. यानंतर काही फिल झाले का? असे ती त्याला विचारते. रोहित यावर ‘नाही’ असे उत्तर देतो. यानंतर दुस-या बाजूने तू धागा खेच, असे ती रोहितला म्हणते. रोहित धागा खेचतो आणि क्षणात अनीता त्याच्या कानशिलात लगावते. त्यानंतर रोहित तिथून निघून जातो. ‘कृपया घरी करू नका,’ असे कॅप्शन देत अनीताने हा व्हिडीओ स्वतःच शेअर केला आहे. अनीताचा हा प्रँक काहींना जबरदस्त आवडला. पण काहींनी मात्र यावरून अनीताला चांगलेच ट्रोल केले.

‘हा निव्वळ मूर्खपणा आहे. हा नव-याचा अपमान आहे. त्याने तुझा असा अपमान केला तर तुला चालेल का?, असा सणसणीत सवाल एका युजरने तिला केला. सोशल मीडियावर असा व्हिडीओ टाकणे अत्यंत किळसवाणे आहे, असेही एका युजरने लिहिले. तर अन्य एका युजरने लिहिले कि, यात काहीही विनोद नाही, आशा करतो तुझ्या नव-याला राग आला नसेल.

https://www.instagram.com/p/CNCVK03gXJT/?utm_source=ig_web_copy_link

अनीता व रोहितने यांनी २०१३ साली लग्न केले होते. यावर्षी फेब्रुवारीमध्येच अनीताने त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. अनीताने आत्तापर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. ये है मोहब्बतें, काव्यांजलि, नागीन अशा अनेक मालिकांमध्ये ती दिसली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here