हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. हि कोरोना प्रतिबंधक लस प्रत्येक वयोगटातील नागरिकांनी घेणे आवश्यक आहे. १८ वर्षांवरील लसीकरणाची सुरुवात झाल्यापासून अनेक सेलिब्रिटी देखील लस घेताना दिसत आहेत. यावेळी ते इतके नखरे करताना दिसत आहेत कि सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे कि इंजेक्शनचा इतका त्रास होतो..? त्यात लस घेतानाचे आपले फोटो किंवा व्हिडीओ ते सर्रास सोशल मीडियावर टाकत आहेत आणि प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जात आहेत. यामुळे अभिनेत्री आशा नेगीने या कलाकारांना ओव्हर अॅक्टिंग करू नका म्हणत चांगलेच फैलावर घेतले आहे.
https://www.instagram.com/p/COuZXIDj65u/?utm_source=ig_web_copy_link
अभिनेत्री आशा नेगीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती म्हणतेय कि, लसीकरणाचा व्हिडीओ शेअर करणाऱ्य़ा प्रत्येक कलाकारासाठी, जागरुकतेसाठी ठीक आहे. पण कृपा करून इतकी ओव्हर अॅक्टिंग करू नका ते खूप त्रासदायक वाटतं”. यासोबत तिने कॅप्शनमध्ये असेही लिहिले आहे कि, कृपा करा.. आणि लोक विचारात आहेत कि व्हिडीओग्राफर स्वत: घेऊन जाता की रुग्णालयाकडून पुरवला जातो. आशाच्या या पोस्टवर अनेकांनी सहमती दर्शविणाऱ्या कमेंट केल्या आहेत. कुणी म्हणतय न जाणे आणखी काय काय पाहावे लागेल. तर कुणी म्हणतय तू नेहमीच खर बोलून जातेस.
https://www.instagram.com/p/CFFJcAUDFaY/?utm_source=ig_web_copy_link
सेलिब्रेटींच्या अशा वागण्यावर अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. आशाच्या या पोस्टवर अनेक टेलिव्हिजन कलाकारांनी देखील कमेंट करत या पोस्टला पसंती दिली आहे. लसीकरणाचा व्हिडीओ शेअर करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचा आशाने या पोस्टमधून चांगलाच कडक समाचार घेतला आहे असे म्हणायला हरकत नाही. दरम्यान अनेक सेलिब्रिटींचे असे फोटोज आणि व्हिडीओज आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांसह शेअर केले आहे. यातील काहींच्या पोस्ट समाजासाठी निश्चितच जनजागृती करणाऱ्या आहेत तर काहींच्या पोस्ट खरोखरच त्रासदायक.