हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे अनेक भागात महापुर आला तर काही ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी देखील झाली. दरम्यान, महाराष्ट्रावर मोठं संकट आले असताना मराठमोळी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पूरग्रस्तांना तब्बल १० कोटींची मदत करत दिलासा दिला आहे. दीपाली सय्यद यांनी कोल्हापूर येथील भुदरगड तालुक्यात ग्रामीण भागात जाऊन नुकसानीची पाहणी केली त्यावेळी हि मदत जाहीर केली
एकीकडे बॉलिवूड कलाकारांवर टीका होत असताना दिपाली यांनी जाहीर केलेली मदत ही बड्या अभिनेत्यांना, अभिनेत्रींना मोठी चपराकच म्हणावी लागेल. दीपाली सय्यद म्हणाल्या, लोक धाय मोकलून रडत आहेत. छत नाही, संसार उघडे पडले आहेत. हे सगळं भयंकर आहे.
दोन वर्ष कोरोना महामारीत गेलंय. कामधंदा बंद आहे. त्यात निसर्गाचा प्रकोप आहे. गावंच्या गावं उद्ध्वस्त झालं आहे. काही उरलं नाही. हे बघाताना भयानक वाटलं.देव किती परीक्षा घेणार? स्ट्राँग आहे म्हणून अजून किती परीक्षा द्यायच्या. कोरोना येतोय, पूर येतोय” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या