हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचे निधन होऊन आता जवळपास महिना उलटून गेला आहे. गेल्या महिन्याच्या २० तारखेला तिच्या वडिलांचे निधन झाले होते. पण म्हणतात ना, मनाच्या अगदी जवळ असणारी मानस विसरता येत नाहीत. त्यांच्या आठवणी पुन्हा पुन्हा त्यांच्या नसण्याची जाणीव करून देत असतात. यामुळे हिना पुन्हा एकदा वडिलांच्या आठवणीत भावूक झाली आहे. तिने तिच्या वडिलांचा एक जुना व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CPGT0cwHYFd/?utm_source=ig_web_copy_link
हिना खानाने आपल्या वडिलांच्या आठवणीत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती आपल्या वडिलांसोबत १९७९ मध्ये आलेल्या ‘गोलमाल’मधील ‘आने वाला पल जाने वाला है’ हे लोकप्रिय गाणे गुणगुणताना दिसतेय. तसेच हा व्हिडीओ शेअर करताना हिनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आज एक महिना पूर्ण झाला बाबा, मला तुमची खूप आठवण येते.’ यासह हिना खानने एक दु: खी इमोजी शेअर केले आहे. हा व्हिडीओ आणि हिनाची पोस्ट पाहिल्यानंतर तिचे चाहते देखील भावुक होऊन तिला काळजी घेण्यास सांगत आहेत.
https://www.instagram.com/p/COhhP91LOUK/?utm_source=ig_web_copy_link
हिना खानच्या वडीलांचे कार्डिअॅक अरेस्टने निधन झाले होते. वडिलांच्या निधनावेळी ती श्रीनगरमध्ये एका शूटिंगच्या निमित्ताने गेली होती. मात्र हे वृत्त कळताच ती मुंबईत त्वरित परतली होती. ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ मालिकेतून हिना प्रत्येक घराघरांत आणि लोकांच्या मनामनांत पोहोचली. तिचा सिनेइंडस्ट्रीत येण्याचा निर्णय तिच्या वडिलांना आधी आवडला नव्हता. पण तिचे यश पाहून त्यांनी तिला आणखी प्रोत्साहन दिले, असे हिना नेहमीच सांगत असते. २०१७ साली फियर फॅक्टर खतरों के खिलाडी या आव्हानात्मक रिऍलिटी शोची हिना रनरअप होती. हिना खानने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. त्यासोबत हिनाने हॅक्ड चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.