कृपा करून प्रार्थना करा..! अभिनेत्री जरीन खानच्या आईची प्रकृती चिंताजनक; सोशल मीडियावर दिली माहिती

0
53
Zareen Khan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री जरीन खान गेल्या अनेक दिवसांपासून विविध अडचणींचा सामना करत आहे. गेल्या महिनाभरापासून जरीन सोशल मीडियापासून खूप दूर होती. यामागील कारणाचा तिने नुकताच खुलासा केला आहे. दीड महिन्यांपासून जरीनची आई अतिशय आजारी आहे. यामुळे जरीन आपल्या आईच्या सेवेत व्यग्र आहे. आता जरीनच्या आईची प्रकृती स्थिर होता होता पुन्हा बिघडल्यामुळे त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. याबाबत जरीनने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना आईसाठी प्रार्थना करण्याची विनंती करीत एक पोस्ट केली आहे.

https://www.instagram.com/p/CPXi62MJ98C/?utm_source=ig_web_copy_link

जरीनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘मला माहितेय मला थोडा उशिर झालाय, पण माझ्या वाढदिवसाच्या आणि ईदच्या शुभेच्छा दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. मला त्यावेळी वैयक्तिकरित्या तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करणे जमले नाही. गेल्या दीड महिन्यांपासून माझी आई आजारी आहे. त्यामुळे मी तिची काळजी घेतेय. दरम्यान वारंवार रूग्णालयात जावे लागतेय. आता तिला पुन्हा रूग्णालयात भरती करावे लागले आहे. कृपा करून माझी आई लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करा,’ असे तिने तिच्या या पोस्टमध्ये लिहिले आहे.

https://www.instagram.com/p/CJioLj2p4DB/?utm_source=ig_web_copy_link

बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान हिने सलमान खानसोबत ‘वीर’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. हुबेहुब कॅटरिना कैफ सारखी दिसते, म्हणून इंडस्ट्रीमध्ये तिची बरीच चर्चा झाली. मध्यंतरी याबाबत जरीनने नाराजी व्यक्त केली होती. सोबतच कॅटरिनामूळे माझे करिअर बरबाद झाले, असेही ती म्हणाली होती. आधी मी आईसारखी दिसते, असे लोक म्हणायचे. पण चित्रपटसृष्टीत आले आणि मी कॅटरिना कैफसारखी दिसते, असे लोक म्हणू लागले. आज कोणताही निर्माता-दिग्दर्शक माझ्या सोबत काम करू इच्छित नाही. कारण मी कॅटरिनासारखी दिसते असे त्यांना वाटते. अशात एका डुप्लिकेटला कोणता निर्माता काम देईल? असा सवाल करत जरीनाने राग व्यक्त केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here