हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कर्नाटक राज्यात हिजाब आणि बुरखा शाळेत परिधान करण्याच्या मुद्द्यावरून वातावरण चिघळल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी विविध स्तरांवरून विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. त्यातच आता बॉलीवूड अभिनेत्री अभिनेत्री कंगना रनौतने यांनी यावर इंस्टाग्रामवर पोस्ट करत भाष्य केले आहे.
कंगनाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. कंगनाने इंस्टावर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये तिने २ फोटो शेअर केले आहेत. यामध्ये लेखक आनंद रंगनाथन यांच्या पोस्टचा स्क्रीनशॉट तिने शेअर केला आहे. या पोस्टमध्ये इराणमधले हे दोन्ही फोटो तिने शेअर केले आहेत. यातील पहिला फोटो हा १९७३ सालातील आहे. यावर कंगनाने लिहिले कि, १९७३ सालामध्ये इराणी महिला बिकिनी घालायच्या. पण आता महिला बुरखा घातलेल्या दिसत आहेत.
यानंतर पुढे कंगना म्हणाली की, “हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये बुरखा न घालता वावरून दाखवा.” कंगनाच्या या स्टोरीमुळे हिजाब प्रकरणाला आणखीच वेगळे वळण येताना दिसत आहे. कारण कंगनाने पोस्ट केल्यानंतर तिच्या चाहत्यांसह अनेक नेटकऱ्यांनी तिच्या मताला आदरपूर्वक संमती दर्शवली आहे. तर काही लोकांनी नेहमीप्रमाणे तिला आणि तिच्या पोस्टला विरोध केला आहे. मात्र तरीसुद्धा कंगनाची ही इंस्टाग्रामवरील स्टोरी चांगलीच चर्चेत असल्याचे दिसत आहे.