Poonam Pandey Death: सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडेचे सरव्हायकल कॅन्सरने निधन झाले आहे. याबाबतची माहिती पूनम पांडेच्याच इंस्टाग्राम अकाउंटवरून देण्यात आली आहे. या बातमीनंतर बॉलीवूड क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. सरव्हायकल कॅन्सर झाल्यामुळे वयाच्या 32 व्या वर्षी पूनम पांडेचे निधन (Poonam Pandey Death) झाले आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पूनम पांडेच्या जवळील मित्र, कुटुंब सदस्य, कलाकार तिला आदरांजली वाहत आहेत.
पूनम पांडेची पोस्ट (Poonam Pandey Death)
पूनम पांडेच्या इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे. कॅन्सरशी झुंज देणारी आपली लाडकी पूनम पांडे आपल्याला सोडून गेली. संपर्कात आलेल्या सर्वांनाच तिने प्रेम दिलं आहे. आता यातून बाहेर पडायला आम्हाला थोडा वेळ द्यावा एवढी विनंती” मात्र या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांनी पूनम पांडेचे अकाउंट हॅक करण्यात आले आहे ही बातमी खोटी आहे असे म्हटले आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
इंस्टाग्राम अकाउंटवरून करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये सरव्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचे म्हटले आहे. मुख्य म्हणजे, गुरुवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी गर्भाशयाच्या कर्करोगापासून बचावासाठी 9 ते 14 वर्षांच्या मुलींना मोफत लस देण्यात येईल अशी घोषणा केली आहे. त्यानंतर आज लगेच याच कॅन्सर मुळे पूनम पांडेचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
पूनम पांडे कोण होती?
पूनम पांडे नेहमीच आपल्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेत असायची. याच पूनम पांडेने क्रिकेट वर्ल्ड कपदरम्यान भारतीय संघ जिंकला तर नग्न होण्याची घोषणा केली होती. त्यावेळी ती सर्वात जास्त चर्चेचा भाग बनली होती. पूनम पांडेने, ‘मालिनी अँड कंपनी’, ‘दिल बोले हडिप्पा’, ‘द जर्नी ऑफ कर्मा’ अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे.