हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठी सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर हिने सांगली जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. सईने प्रिय सांगलीकर काळजी घ्या असे आवाहन ट्विट करून केले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या ट्विटला रिट्विट केले आहे.
सांगली जिल्ह्यात बुधवारी 1 हजार 833 कोरोना पाॅझिटीव्ह आढळले आहेत. बुधवारी जिल्ह्यातील सर्वात उच्चांक गाठणारी रूग्ण संख्या आहे. ही शृंखला मोडणे गरजेचे आहे. त्यामुळे बुधवारी मध्यत्रीपासून सुरू होणाऱ्या लाॅकडाऊनला प्रतिसाद द्या. प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करा. घरीच रहा, सुरक्षित रहा ! असे ट्विट पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
प्रिय सांगलीकर … नियम पाळा! कठीण परीस्थिती आहे म्हणून कठीण निर्बंध आवश्यक आहेत. काळजी घ्या. 🙏🏼. https://t.co/HWY7quEIBh
— Sai (@SaieTamhankar) May 5, 2021
पालकमंत्र्याच्या या ट्विटला रिट्विट करत सिनेअभिनेत्री सई ताम्हणकरने म्हटले आहे. प्रिय सांगलीकर… नियम पाळा कठीण परिस्थिती आहे म्हणून कठीण निर्बंध आवश्यक आहेत. काळजी घ्या.