हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नुकतीच कुणाल बेनोडेकर सोबत दुबईत लग्न बंधनात अडकली आहे. ७ मे २०२१ रोजी तिने लग्न केले. तिच्या वाढदिवसादिवशी तिने सोशल मीडियावर पोस्ट करून ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. लग्नाचे वृत्त समजताच तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पण काही युझर्स तिच्या लग्नाच्या पोस्टनंतर तिला ट्रोल करताना दिसले. अखेर या ट्रोलर्सना सोनालीने चांगलेच सडेतोड उत्तर दिले आहे. आता आता खपवून घेणार नाही, किमान मी तरी नाही असे म्हणत तिने या ट्रोलर्सना चांगलेच फैलावर घेतले आहे. तिच्या रिप्लायनंतर चक्क एका युजरने स्वतःची कमेंटच डिलीट केली आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या ट्विटर अकाउंटवर तिने पोस्ट केलेल्या लग्नाच्या फोटोंवर अनेक कमेंट्स आल्या. त्यातील काही विनाकारण वैयक्तिक बाबींत नाक खुपसणाऱ्या आणि टीका करणाऱ्या जहरी आणि खोचक कमेंट्स होत्या. एका युझरने सोनालीला ट्रोल करण्याच्या उद्देशाने लिहीले की, ‘परदेशात मजा करत आहेत. कोरोनासाठी मदत करा.’
Really???
तुम्ही, आम्ही केलेली मदत पाहिली नाही, म्हणून आम्ही काही केलंच नाही,
किंवा करतंच नाही, असं होत नाही.
मी काय मदत केलीये ती बोंबलून सांगणं मला तरी योग्य वाटत नाही 🙏🏻असो, सगळ्यांना एकाच पठडीत बसवणं चूकीचं आहे.
— Sonalee Kulkarni (@meSonalee) May 20, 2021
यावर सोनालीने उत्तर देत म्हटले, ‘खरचं??? तुम्ही, आम्ही केलेली मदत पाहिली नाही, म्हणून आम्ही काही केलंच नाही, किंवा करतंच नाही, असे होत नाही. मी काय मदत केलीये ती बोंबलून सांगणे मला तरी योग्य वाटत नाही असो, सगळ्यांना एकाच पठडीत बसवणे चुकीचे आहे. यानंतर चक्क या युजरने ट्विट डिलीट करून टाकले.
मित्रा UAE हा देश परदेशी लोकांना नागरिकता प्रदान करत नाही.
So please, just because you can, म्हणून उठ-सुट बोलायचं नाही. ज़रा अभ्यास करा— Sonalee Kulkarni (@meSonalee) May 20, 2021
त्यात दुसऱ्या एका युझरने केलेल्या टिकेवर सोनाली चांगलीच वैतागली. तिने लिहिले की, ‘तुम्हाला काहीही वाटू शकतं आणि तुम्ही आम्हाला काहीही बोलू शकता…हे आता खपवून घेणार नाही.किमान मी तरी नाही. समाजभान ठेऊन वागणे, समाजाला देणे लागणे, देऊ करणे, जबाबदार नागरिक म्हणून वावरणे, माणुसकी जपणे… हे सगळं आम्ही करायचं आणि तुम्ही फक्त बसून अश्या फुकट कमेंट्स टाकायच्या.’
तुम्हाला काहीही वाटू शकतं आणि तुम्ही आम्हाला काहीही बोलू शकता…
हे आता खपवून घेणार नाही.
किमान मी तरी नाही 🙏🏻
समाजभान ठेऊन वागणे, समाजाला देणे लागणे, देऊ करणे, ज़बाबदार नागरिक म्हणून वावरणे, माणुसकी जपणे…
हे सगळं आम्ही करायचं आणि तुम्ही फक्त बसून अश्या फुकट comments टाकायच्या— Sonalee Kulkarni (@meSonalee) May 20, 2021
सोनाली आता लग्नानंतर कोरोनाच्या काळात परतणे शक्य नसल्यामुळे तूर्तास तरी दुबईतच वास्तव्यास आहे. मात्र नक्कीच ती मातृभूमीत परतेल अशी शक्यता आहे.