अभिनेत्री असलेल्या नवनीत राणा राजकारणात कशा आल्या? जाणून घेऊया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांचे पती बडनेराचे आमदार रवी राणा हे दोघांची महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा आहे. मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करण्याचे खुले आव्हान नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना दिले आणि इथेच शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य हा वाद रंगला. नवनीत राणा यांच्यावर सामाजिक तेढ निर्माण केल्याचा आरोप असून सध्या त्या तुरुंगात आहेत. नवनीत राणा या नेहमीच काही ना काही कारणांनी सतत चर्चेत असतात. नवनीत राणा नेमक्या कोण आहेत आणि त्यांचा आजपर्यंतचा प्रवास आज आपण जाणून घेऊया

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी नवनीत राणा या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करत होत्या. त्यांनी तमिळ, तेलुगू मिळून एकूण 20 चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. मूळच्या पंजाबी असलेल्या नवनीत राणा यांची चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. त्यांचे वडील आर्मीत होते तर आई हाऊस वाइफ होती.

Navnit Rana Hot Photo / Find the best free stock images about hot. - Syara Wall

मुळातच खूप सुंदर असलेल्या नवनीत राणा या एकेकाळी ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात. त्या फिटनेसच्या बाबतीतही खूप जागरूक आहेत. अभिनय सोडल्यानंतरही त्यांनी आपल्या फिटनेसकडे कटाक्षाने लक्ष दिले. त्यांनी Chetna: The Excitement या एका हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. त्या आपल्या बोल्ड इमेजसाठी ओळखल्या जात असे. चित्रपटात काम करणे सोडल्यानंतर त्या नेहमीच साडीमध्ये दिसून येतात.

Will put you in jail too': MP Navneet Rana alleges Sena leader threatened her for raising Waze case in Parl | Maharashtra News

 

2011 साली आमदार रवी राणा यांच्याशी त्यांनी लग्न केलं . नवनीत राणा यांचा विवाहसोहळाही चर्चेचा विषय ठरला होता. 3100 जोडप्यांसह त्यांनी सामूहिक विवाहसोहळ्यात नवनीत राणा यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. या विवाहसोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या.

Hanuman Chalisa row: MLA Ravi Rana, wife Navneet arrested by Mumbai Police - India News

रवी राणा यांच्याशी लग्न केल्यानंतर नवनीत राणा या राजकारणात सक्रिय झाल्या. 2014 साली नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्य तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत नवनीत राणा पराभूत झाल्या. मात्र, 2019 च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून लढताना त्यांनी आनंदराव अडसूळ यांचा 36000 मतांनी पराभव करून त्या लोकसभेवर गेल्या. नवनीत राणा या सर्वांत सुंदर खासदारांपैकी एक आहेत.

 

Leave a Comment