डिजिटल ट्रान्सझॅक्शन करताना नेहमीच लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात ऑनलाईन ट्रान्सझॅक्शनमध्ये लक्षणीयरीत्या वाढ झाली आहे. परंतु या माध्यमातून फसवणूकीच्या घटना देखील वाढत आहेत. डिजिटल ट्रान्सझॅक्शनमध्ये होणारी वाढती फसवणूक पाहता देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या ( स्टेट बँक ऑफ इंडिया) SBI ने आपल्या ग्राहकांसाठी काही डिजिटल सिक्योरिटी गाइडलाइन्स तयार केल्या आहेत. या गाइडलाइन्स बँकेने आपल्या ग्राहकांसोबतही शेअर केल्या आहेत.

जर तुम्ही देखील SBI चे खातेदार असाल तर या गाइडलाइन्स जाणून घेणे तुमच्यासाठी महत्वाचे ठरेल. तसेच ऑनलाईन पेमेंट करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमचे खाते देखील हॅकर्सपासून सुरक्षित राहू शकेल.

लॉग इन सिक्योरिटी
सर्वप्रथम तुम्हाला डिजिटल ट्रान्सझॅक्शनसाठी लॉग इन करावे लागेल. हा पासवर्ड प्रोटेक्टेड असतो. त्यामुळे ओळखण्यास अवघड जाणारा पासवर्ड ठेवा. तसेच आपला हा पासवर्ड वेळोवेळी बदलत राहा. याशिवाय तुमचा युझर आयडी, पासवर्ड किंवा पिन डिटेल्स कोणासोबतही शेअर करू नका. बँक तुम्हाला कधीही युझर आयडी, पासवर्ड, पिन, सीव्हीव्ही, ओटीपी किंवा कार्ड नंबर डिटेल्स विचारत नाही. तुमच्या कॉम्प्युटर, मोबाईल किंवा टॅबवर युझर आयडी आणि पासवर्ड कधीही सेव्ह करू नका. तुमच्या डिव्हाइसवर ऑटो सेव्ह किंवा रिमेम्बर फंक्शन डिसेबल्ड करणे केव्हाही चांगले आहे.

मोबाइल बँकिंग
मोबाईल बँकिंगसाठी नेहमी मजबूत पासवर्ड आणि बायोमेट्रिक परमिशन एनेबल्ड करा. तुमचा मोबाईल पिन कोणाशीही शेअर करू नका. जर तुम्ही बायोमेट्रिक ऑथेंटिफिकेशन वापरत असाल तर ते सुरक्षिततेच्या दृष्टीने ते अधिक चांगले होईल. अज्ञात एप्स डाउनलोड करणे आणि सार्वजनिक ठिकाणी वाय-फाय नेटवर्क वापरणे टाळा.

कार्ड सिक्योरिटी
डेबिट किंवा क्रेडिट कार्डने ट्रान्सझॅक्शन करताना एटीएम मशीन किंवा पीओएस डिव्हाइसेसवर लक्ष ठेवा. पिन टाकताना काळजी घ्या आणि कीपॅड झाकून ठेवा. डेबिट कार्डद्वारे केलेले ट्रान्सझॅक्शन फक्त ऑनलाइन बँकिंगद्वारेच करा आणि तुम्ही ज्याला पैसे देत आहात त्याची सत्यता तपासा. कार्डद्वारे केलेल्या ट्रान्सझॅक्शनसाठी लिमिट सेट करा.

UPI सिक्योरिटी
तुमचा मोबाईल पिन आणि UPI पिन नेहमी वेगवेगळा ठेवा. कोणत्याही अज्ञात UPI रिक्वेस्टला प्रतिसाद देऊ नका. नेहमी संशयास्पद रिक्वेस्टची तक्रार करा. तुमच्या नकळत कोणताही ट्रान्सझॅक्शन झाले असेल तर UPI सर्व्हिस तात्काळ डिसेबल करा.

इंटरनेट सिक्योरिटी
बँकेची वेबसाइट उघडताना नेहमी https कडे लक्ष द्या. याशिवाय कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाय-फाय नेटवर्क वापरून ऑनलाइन ट्रान्सझॅक्शन करणे टाळा. नेहमी लॉग आउट करा आणि तुमचे काम पूर्ण झाल्यास ब्राउझर बंद करा.

सोशल मीडिया सिक्योरिटी
तुम्ही सोशल मीडियावर ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्याची ओळख नेहमी पडताळा. कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमची वैयक्तिक आर्थिक आणि गोपनीय माहितीबाबत चर्चा किंवा शेअर करू नका.

Leave a Comment