हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Adhaar Card Pan Card Link : गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याबाबत महत्वाची माहिती शेअर केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी पॅन कार्डशी आधार लिंक करण्यात उशीर केल्यामुळे लावण्यात येणाऱ्या शिक्षेचा बचाव केला आहे. हे लक्षात घ्या कि, आधारशी पॅन लिंक करणे 31 मार्च 2022 पर्यंत मोफत होते, मात्र 1 एप्रिल 2022 पासून त्यावर 500 रुपये दंडाची तरतूद केली गेली होती.
जुलै महिन्यात करण्यात आले 1000 रुपये
सध्या 30 जून 2023 पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही तर ते इनऍक्टिव्ह होईल. एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना गुरुवारी सीतारामन यांनी सांगितले की, याआधी पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी खूप वेळ दिला गेला होता. त्यामुळे आत्तापर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक करायला हवे होते. ज्यांनी अजूनही ते केलेले नाही त्यांनी ते लवकरात लवकर करावे. तसेच सध्या निश्चित केलेली मुदत संपल्यानंतर दंडाची रक्कम देखील आणखी वाढवली जाईल.Adhaar Card Pan Card Link
हे लक्षात घ्या कि, TDS आणि TCS संबंधित समस्या टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपले आधार पॅन कार्डशी लिंक करायला हवे. अर्थ मंत्रालयाने याबाबत 28 मार्च रोजी एक निवेदन देखील जारी केले होते. तसेच जी लोक असे करणार नाही त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. तसेच त्यांना TDS आणि TCS क्लेम मिळवण्यात अडचणी येऊ शकतील. Adhaar Card Pan Card Link
या निवेदनानुसार, इन्कम टॅक्स कायदा, 1961 अंतर्गत, 1 जुलै 2017 पर्यंत ज्या लोकांच्या नावे पॅन कार्ड जारी करण्यात आले आहे, त्यांनी 31 मार्च 2023 पर्यंत आधार-पॅन लिंक करावे. ते लिंक करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. जर यानंतरही आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नाही, त्यांचा 1 जुलै 2023 पासून त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. Adhaar Card Pan Card Link
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.incometax.gov.in/iec/foportal/help/how-to-link-aadhaar
हे पण वाचा :
LIC च्या ‘या’ सुपरहिट योजनेत एकदाच पैसे जमा करून आजीवन मिळवा 50,000 रुपयांची पेन्शन
आता Netflix वर फ्रीमध्ये पहा चित्रपट, फार कमी लोकांना माहीत आहे ‘हा’ जुगाड
सलग 6 धक्क्यांनंतर RBI कडून मिळाला दिलासा, सध्यातरी वाढणार नाही ग्राहकांचा EMI
Share Market मधून फायदा मिळवण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी !!!
Credit Card : Phonepe, Google Pay वर क्रेडीट कार्ड सारखी सुविधा; पैसे नसले तरी खर्च करता येणार..