पुणे |सुनिल शेवरे
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मुहर्तमेढ रोवली गेली ती पुण्यात. महाराष्ट्राच्या सांस्क्रूतिक राजधानीत. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लोकमान्य टिळकांनी देशबांधवांमध्ये देशप्रेम जागृत करण्यासाठी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या श्रीगणेशा केला. लोकमान्यांना अभिप्रेत असलेला उत्सव व समाज प्रबोधनाचे कार्य तिथे होऊ लागले. हाच वारसा आजतागायत प्रामुख्याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट, शनिवारपेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, सेवा मित्र मंडळ ट्रस्ट, साईनाथ मित्र मंडळ ट्रस्ट हि गणेश मंडळे जपत आहेत.
समाजाला विधायक वळण देण्यासाठी, समाजात एकात्मता, बंधुभाव निर्माण होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आधुनिक टिळकांच्या कार्याचा आदर्श समाजातील तरुणांपुढे निर्माण व्हावा, त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा यासाठी या देखाव्याचे नियोजन केले आहे. समाजातच मिसळुन, समाजाला बरोबर घेऊन सामाजिक कार्य करणार्या, सामान्य असुनही असामान्य कार्य करणार्या या व्यक्तींपासुन प्रेरणा इतर गणेश मंडळे चांगल्या कार्याकडे आेढले जावेत हा या मागचा उद्देश आहे. तसेच केरळ ला केली धान्याची आणि मुलभुत वस्तुची मदत त्यामध्ये साबण बिस्किटे औषधे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या वेळी देखाव्याच्या शुभारंभ दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट चे अध्यक्ष श्री.अशोकराव तात्यासाहेब गोडसे यांच्या हस्ते झाले.
मंडळ आणि पदाधिकारी
सेवा मित्र मंडळ ट्रस्ट – शिरिष मोहिते
शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक मंडळ ट्रस्ट- पराग ठाकुर
आदर्श मित्र मंडळ ट्रस्ट-उदय जगताप
साईनाथ मित्र मंडळ ट्रस्ट- पियुष शहा
उपस्थित होते
अष्टविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पवार, उपाध्यक्ष – प्रकाश रेणुसे मंडळाचे सभासद- रोहित वाव्हळ,महेश गवळी,सचिन सोनवणे,विनायक गावडे,कुणाल निकम,बबन दायमे,सोमनाथ काशिद उपस्थित होते.