हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘इंडियन आयडॉल १२’ शो सध्या विविध वादांमुळे रोज चर्चेत असतो. अलीकडेच किशोर कुमार स्पेशल एपिसोडवरून शोवर लोकांनी चांगल्याच टीका केल्या होत्या. किशोर कुमार यांचे पुत्र अमित कुमार यांनीही या एपिसोडनंतर शोची पोलखोल केली होती. ते म्हणाले होते कि, शूट सुरू होण्यापूर्वीच मला स्पर्धकांचे कौतुक करायचं आहे असं सांगण्यात आले आणि मी तेच केले, कारण मला पैसे मिळाले, यामुळे हा शो चांगलाच वादात अडकला. पुढे हा वाद मिटला देखील नव्हता तोच शोचा होस्ट आदित्य नारायणने अलिबागबद्दल आक्षेपार्ह विधान केले. यामुळे मनसेने त्याच्या विरोधात आक्रमक बंड पुकारले. त्याला अलिबागकारांची माफी मागण्याचा कडक इशाराही दिला. त्यानंतर आदित्यने फेसबुकच्या माध्यमातून अलिबाग वासियांची जाहीर माफी मागितली आहे. या पोस्टसोबतच त्याचा व्हिडीओदेखील अमेय खोपकर यांनी शेअर केला आहे.
मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आदित्य नारायणला कडक भाषेत इशारा दिला होता. त्यानंतर आदित्यने फेसबुक पोस्ट करत अलिबागकरांची माफी मागितली आहे. आदित्य म्हणतोय की, मी नम्रपणे हात जोडून अलिबागच्या लोकांची माफी मागतो. माझ्या अलीकडच्या एपिसोडमध्ये मी अलिबागबद्दल जे विधान केले त्यावरून अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा कधीही कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मला अलिबागबद्दल प्रेम आणि आदर आहे. माझ्याही अलिबाग ठिकाणाशी अनेक भावना जोडलेल्या आहेत. तिथले लोक आणि मातीचा मला आदर आहे’.
https://www.facebook.com/662630549/videos/pcb.10160945423365550/10160945411795550
तर झालं असं कि, इंडियन आयडॉल होस्ट करणाऱ्या आदित्य नारायणने नुकत्याच पार पडलेल्या भागात एका स्पर्धकाबरोबर बोलताना ”राग पट्टी ठिक से दिया करो, हम क्या अलिबागसे आये है क्या” ? असे विधान केले होते. आदित्यच्या याच विधानावर वाद उपस्थित झाला होता. अलिबागविषयी असे उद्गार काढणे प्रेक्षकांनाही चांगलेच खटकले. अनेकांच्या भावना दुखावल्या. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही आदित्यचा आगाऊपणा वाढलाय, हि कुठली बोलायची पद्धत..
https://www.facebook.com/662630549/videos/10160944223995550/
तसेच अलिबागकारांची माफी माग आणि असे पुन्हा झाले तर कानाखाली आवाज काढेन अशा कडक शब्दात आदित्यला चांगलाच दम भरला होता. तसेच हिंदी चॅनेवर अनेकदा कलाकार अलिबागसे आये है क्या म्हणताना दिसतात. अशा लोकांना अलिबागची संस्कृती माहिती नाही? आमच्या अलिबागची लोकं माहिती नाही? ‘अलिबागकरांचा हा अपमान आहे. ही कोणती बोलायची पद्धत झाली असा संताप खोपकरानी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून व्यक्त केला होता.