हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप मधील दरी ही वाढतच चालली असून आता शिवसेना युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. राज्यात सत्ता नसल्याने फडणवीसांना वैफल्य आले आहे अशी जोरदार टीका आदित्य ठाकरे यांनी केली. आदित्य ठाकरे चंद्रकांत दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
आदित्य ठाकरे हेचंद्रपूर दौऱ्यावर होते. शहरातील गोंडकालीन रामाळा तलावाच्या काठाशी त्यांनी तलावाच्या खोलीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या कामाची पाहणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी फडणवीसांवर टिका केली. सरकार गेल्यापासून दोन वर्षात फडणविसांमध्ये नैराश्य आलं आहे. विरोधी पक्षाच्या वागण्यात ते दिसत आहे असे ते म्हणाले.
ते कधी म्हणतात मुख्यमंत्री आहे, कधी म्हणतात नाही. कधी म्हणतात सरकार आहे, तर कधी म्हणतात नाही. मात्र, लोकांचा सरकारवर विश्वास आहे. जे डोळे बंद करुन फिरतात त्यांना काहीच दिसणार नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावलाय. सत्तेतील तिन्ही पक्ष आनंदाने एकत्र आहोत. कोणताही वाद नाही. मिळून अन्यायाविरुद्ध लढा देऊ, असंही आदित्य ठाकरे असेही ते म्हणाले.