हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “सरकार घटनाबाह्य असून गद्दारच इथं नेते बनल्यावर त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार. शिंदे सरकार हे निर्लज्ज आहे. घोटाळेबाज मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यानी अध्यापही राजीनामे घेतलेले नाहीत कारण त्याच्याकडे नाइथिकताच शिल्लक राहिली नसून त्याच्यात हिम्मत नाही ,” अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केली आहे.
नागपूर येथील विधीमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा दहावा दिवस आहे. अधिवेशनापूर्वी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सध्याचे सरकार हे घटनाबाह्य असून अनैतिक आहे. गद्दारच या ठिकाणी नेते बनल्यानंतर त्याच्याकडून काहीच अपेक्षा नाही. ‘स्वतःला खोके आणि महाराष्ट्राला धोके’ हि भूमिका आहे ती आज रोजच दिसत आहे.
रोज एक नवा घोटाळा लोकांसमोर येत आहे. गद्दारांच्याच गटातून येत आहे. हे सर्व येतंय कुठून याचा विचार त्यांनी करायची गरज आहे. नुसते आरोप होत नसून सर्व कागदपत्रे दिली जात आहे. या सर्व लोकांची खरं तर हकालपट्टी होणं गरजेची आहे. या चाळीस जनातील मंत्र्याची हकालपट्टी अद्यापही मुख्यमंत्र्यानी करणे गरजेची होती. पण त्यांच्यात हिंमत नाही. नैतिकता शिल्लक नाही, अशी घणाघाती टीका ठाकरेंनी केली.