सरकार कोसळणार?? आदित्य ठाकरेंनी ट्विटर हँडल वरून पर्यावरण मंत्रीपद हटवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेने दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता असून ठाकरे सरकारही धोक्यात येऊ शकते. त्यातच आता पर्यावरण मंत्री असलेल्या आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटर हँडलवरून पर्यावरण मंत्रिपदाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलंय.

आदित्य ठाकरेंनी ट्विटर हँडलवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटवून युवासेना प्रमुख असं ठेवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी 1 वाजता कॅबिनेट बैठक घेणार आहेत, त्यापूर्वीच आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर हॅंडल वरून पर्यावरण मंत्री पदाचा उल्लेख हलवल्या मुळे लवकरच ठाकरे सरकार पडणार असल्याच्या चर्चानी जोर धरला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे 45 आमदार असल्याचा दावा केला आहे. शिंदे आपला 1 गट तयार करून भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात भाजपचे सरकार पुन्हा एकदा येऊ शकते.

 

Leave a Comment